काय झालें तें नयेचि सांगूं । अंतरींच भोगूं - धृ.
धृतीचा हा डोळा, असतांचि, कल्पना बाहुली हे परतली ।
चालतां राहिली चालचि, वाचा बोलतां निमाली - 1
पुढिलें हें थोकलें योजना मोडली आठवण मागली ।
दृश्य द्रष्टा मनीं न गणितां, मीपण दोरीच हे काढिली -2
सोहिरा म्हणे आतां हारपली मुद्रा, सहजेंचि निद्रा उन्मनी लागली -3