साधु या प्रकारचे हो प्राणी तूं ध्यानीं आणी
दृश्यभासाला दृष्टीं नाणीं
ज्याचे पिंडीं नांदते तूर्याराणी जाणा हो जाणा - धृ
अद्वैताचें भजन करीत हा लाभ त्वरीत
घेउनि बैसति आनंदभरीत
सहज समाधि-वनितेला वरीत जाणा हो जाणा - 1
जन्मा येउनि परम दक्ष साधिति मोक्ष
लाविती निरंजनिं लक्ष
सकळ व्यापक स्वरूप हें अलक्ष जाणा हो जाणा - 2
केवल संतोषाचे गोळे ह्रदयिंचे भोळे
मन हें प्रेमामाजी लोळे
लागती ज्यांचे परब्रह्मी डोळे जाणा हो जाणा - 3
टाकुनि इतर सकळ धंदा लागती छंदा
भेदुनि गेले हो नादबिंदा
जाउनि मिळाले जगदादिकंदा जाणा हो जाणा - 4
जें जें समयीं घडलें साहती पाहण्याला पाहती
निजींचा निदिध्यास वाहती
अखंडित जे निरालंबी राहती जाणा हो जाणा - 5
सोहिरा म्हणे हो त्यांचे तोडी नाहीं दुसरी जोडी
त्यांची त्यांनाच ठावी गोडी
परमामृतसागरीं दिधली बुडी जाणा हो जाणा - 6