संसारी रमसी मना भ्रमसि तूं कां भोगिशी आपदा ।
अभ्रींची जसि साऊली दिसतसे कोणाचि हे संपदा ॥
शाल्यन्नोदन दिव्यभोग रति हे कीं नूपजे श्वापदा ।
सोहिरा म्हणतो विवेक नसतां आरुढुनी ज्या पदा ॥