दिसणें हे सरलें अवघें प्राक्तन हें मुरलें - धृ.
आलों नाही गेलों नाही मध्यें दिसणें हे भ्रांती
जागृत होतां स्वप्नचि हरपे कर्पुर न्यायें जग हरलें - 1
दिसणें हाचि जन्म योगियां ना दिसणें हा मृत्यु म्हणा
गैबिप्रसादें गैबचि झालें आप आपणामधिं लपलें - 2
मछिंदर गोरख जालंदर हे न्याया आले स्वस्वरूपीं
जातां जातां गमनग्राम तें समूळ कोठें ना गमलें - 3
म्हणे सोहिरा सत्रा चौदा मधुमासाच्या नवम दिनीं
सगुणस्वरूपीं निर्गुण ठेलें अनुभव हरले स्वरूप कळे - 4