लागला निदिध्यास अविनाशसुखाचा - धृ.
निराकार निर्गुण निरंजन निरामयाचा - 1
धन्य हें मौन्य, महाशून्य चैतन्य अखंडिताचा - 2
ज्ञान निरवधि, सहजसमाधी, सकळकळानिधीचा - 3
कलिमलदहन, गहन मनमोहन, दयार्णवाचा - 4
कायादंडन, नलगे मुंडन, नलगे रूका हा सदा फुकाचा - 5
निष्काम आराम, हा राम, कल्पद्रुमाचा - 6
दुमदुमिलें अंबर, स्थिरावली नजर, होता हे गजर, अनाहतध्वनींचा - 7
म्हणे सोहिरा दास उदास, हा छंद सदा सच्चिदानंदाचा - 8