सद्गुरूकृपेचें हें देणें समाधान केले तेणें - धृ.
पावविलें ऐसें खुणें जेथ नाही जाणें येणें - 1
सुखें सुखांतचि लोळणें प्रेम नयेचि बोलणें - 2
निका तुटला भेदाभेद जाहला सहज आनंद - 3
विकासलें निरंजन उन्मीळले हे लोचन - 4
मना नाहीं हो संचार ऐसें अगम्य अगोचर - 5
नामरूप न हीं ज्याला ऐसा गैबची कीं झाला - 6
मज बैसविलें स्वस्थ जेथें उदो नाहीं अस्त - 7
पडे मेघाविण पाऊस चांदणियाविण प्रकाश - 8
हें परमामृत पारणे मज झालें सोहिरा म्हणे - 9