हकनाक आयुष्य जाय । प्राण्या तूं उगाच बससी काय ॥धृ॥
मनासी मानेल तेंच तूं करिसी । देवासी जें कां नसाय ।
विचार बोलुनि करिसी तूं अवघा । हा कृत्रिम व्यवसाय -1
अति प्रीतिनें देहा पाळिसी । भिक्षुकां देसि दुराय ।
अनुतापाविण नरकी पडसी । मग हा न चले उपाय - 2
स्वदारा हा परदारा हो । भुलणें हाचि अपाय ।
भोग भोगितां रोग उठती । रक्त-पित्त कफादिक वाय -3
अनादि हा सत्य ईश्वर । म्हणोनि सोहिरा गाय ।
मलाहि दिसतो तुलाहि सांगतों । पुढील तरणोपाय -4