आतां तरि सोडी रे ! हा संग । जनिं वनिं हो नि:संग - धृ.
विषयसंयोगें धरिसी सोंग । दु:खेंंचि होसी दंग ।
अभ्र सावुलीं जेविं बाहुली । बेगडिचा हा रंग - 1
परनारीशीं करूनि उपरती । आवरिं हा कीं अनंग ।
ब्रह्मरसाचे भावनेविण । रजतमें होय जीव वंग - 2
योगाभ्यासें करूनी साधीं । बैठक पवन तुरंग ।
धांवे जेथ कीं तेथ धरावा । हा मन चपल कुरंग -3
नसोनि दिसतें केवळ जग हें । मृगजळिंचे किं तरंग ।
चिद्भानु हा कारण आत्मा । पहा तूं कीं अंतरंग -4
म्हणे सोहिरा निर्गुण ध्यानीं नये तरि, । स्मरिं सांवळि मूर्ति सुरंग ।
वैकुंठपति हा व्यापक विष्णु । अवघाचि कीं श्रीरंग - 5