कांहीं सार्थक करीं तूं प्राण्या लौकर रे - धृ.
देह हें स्थूळ भ्रमाचें मूळ । प्रपंच म्हणणें अवघें खूळ । शेवटिं तुजला हें प्रतिकूळ ।
अंतीं कांहीं नाहीं, हें तंव दिसे क्षणभर रे - 1
सोडुनि स्वार्थ धरी परमार्थ । आत्महिताविण फिरणें व्यर्थ ।
गुरुमुखें समजुनि घ्यावा अर्थ । सांगितलें तुज तें तें कांहीं चित्तीं धर रे - 2
शरिरीं कवण हा साक्षी पाहा । त्याला पाहुनि तेथचि रहा । ध्यास निरंतर तोचि वाहा ।
विश्वातीत परमात्मा तो हा । तद्रुपची होउनियां जीव उद्धर रे - 3
अनंतरूपीं हा अनंत वसतो । दृष्टीविण हा सदैव दिसतो । कांहिंच नाहीं त्या रूपीं असतो ।
सर्वगतचि कीं, व्यापक हा विश्वंभर रे - 4
म्हणे सोहिरा निश्चय व्हावा । तरीच तुजला पडेल ठावा ।
केवळ मिळसी जरि सद्भावा । स्तवि वेद वदनीं नित्य वदावा ।
महादुस्तरची भवनदि कीं हे माया तर रे - 5