प्राण्या सदां सुखी त्वां असावें - धृ.
अवचट हें निर्माण होतें याचि प्रकारें विलया जातें
सखेद होऊनि उगीच असतें तेथें कोणावरी बा रुसावें - 1
चिंता वाहतो कोण पाहतो अचल अमर येथें कोण राहतो
त्रैलोक्यपोटीं कोण साहतो स्वरूप तुला तें दिसावें - 2
प्रपंच ही मायेची माव सुखदु:खाचे बसती घाव
एकवेळ निरंजनिं पाव तत्व हें पंचवीसावें - 3
सोहिरा म्हणे स्वस्थ असावें मन हे संशयभूत नसावें
परब्रह्म हें ह्रदयिं ठसावें मग आनंदें स्वस्थ असावे - 4