संसार प्राण्या थोडा रे थोडा रे
जैसा पाण्याचा बुडबुडा वेगीं सोडा रे सोडा रे - धृ.
त्रिकुटीं मन हें ओढा ब्रह्मरंध्र फोडा
विषयगोडावरली माशी तेंवी मोहपाश तोडा रे तोडा रे - 1
इंद्रियें हीं कोंडा वरि नियमांचा हा धोंडा
ठेवुनि अभिमान दवडा
दूर करोनियां आधीं विकल्प मनिंचा मोडा रे मोडा रे - 2
सोहिरा म्हणे गाढा नाडा पंचभूतांचा झाडा
यांतुनि हें चित्त काढा अविनाश गुरुपद जोडा रे जोडा रे -3