लय लागलें आत्मारामीं । जाहला आनंद अंतर्यामीं - धृ.
बद्ध मारिला अहंकार हरामी । कर्म केलें कीं परिहरा मी ।
युक्त केलें कीं हवि रामीं । श्वासोच्छ्वास प्यालों वारा मी - 1
देहीं असोनी असें कीं न्यारा मी । कधीं न साहेंचि विकारा मी ।
कांहीं न घेंचि कल्पना घेरा मी । नाना योनींचा न फिरे फेरा मी - 2
वासना हे न ठेवीं उदारा मी । लुब्ध होईना घरदारां मीं ।
मन लक्षिला मोक्ष उदारा मी । शरण आलों दीनोद्धारा मी - 3
कधीं न लिंपे संसारकेरा मी । यमधर्माच्या नाटोपें वैरा मी ।
गोष्टी सांगेन तीनतेरा मी । भगवानाचा होईन प्यारा मी - 4
विपरीतरीती इंद्रियग्रामीं । यांचा नायकेंच कधिं आग्रह मी ।
कधीं न जाय निंदानगरा मी । दशवेद्वारींच्या राहिलों अग्रा मी - 5
सोहिरा म्हणे या यंत्रा मी । देखियला कीं भ्रामयंत्रा मी ।
विसरेना विवेकमंत्रा मी । उगी पाहतों जीवयंत्रा मी - 6